Farmers News : संतापजनक..! पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; कुठे घडला प्रकार?
Farmers news : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे ज्वारी खरेदीच्या टोकनसाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Farmers news : भडगाव येथे शेतकऱ्यांसोबत संतापजनक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली असताना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना समोर आली आहे. (Farmers news)
माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव शेतकरी संघाच्या नियोजनातील त्रुटींमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात शेतकरी टोकनसाठी जमा झाले होते. भर उन्हात शेतकरी लांबच लांब रांगेत उभे होते. मात्र, प्रशासनाकडून ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती, ना सावलीची सोय करण्यात आली होती.
या गैरसोयीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Farmers news)
यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र टीका केली जात आहे.
या घटनेमुळे शेतकरी संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Farmers news)





