Jairam Ramesh : अधिवेशन बोलावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन; जयराम रमेश यांची टीका
राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी नारी शक्ती वंदन कायद्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु असताना अचानक संसदेचे अधिवेशन बोलावणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

Jairam Ramesh : राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी नारी शक्ती वंदन कायद्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु असताना अचानक संसदेचे अधिवेशन बोलावणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पत्रानुसार, लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन कधीही केले जाऊ नये. रविवारी, जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र शेअर केले.
त्यांनी लिहिले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत आपले मत पंतप्रधानांना पत्र लिहून व्यक्त केले आहे.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे अधिवेशन पुढच्या आठवड्यात बोलावले जात आहे, जे आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे.
२९ एप्रिलनंतर कधीही सर्वपक्षीय बैठक बोलवावी, या विरोधी पक्षांच्या विनंतीचा खर्गे यांनी पुनरुच्चार केला आहे. पण सध्याचे एनडीएचे सरकार मन मानेल तसे वागत असून यामुळे लोकशाही प्रक्रियेला खीळ बसू शकते, असे रमेश (Jairam Ramesh) यांनी स्पष्ट केले.






