निवडणुकानंतर लालूप्रसाद यांच्या अन्नग्रहणावर परिणाम
Updated On:

रांची – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी अन्नग्रहण कमी केले आहे. रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल लालू यादव यांच्या डॉक्टर्सनी याबद्दल माहिती देत खाणं सोडल्याने त्यांची प्रकृती बिघडत चालल्याचे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीत राजदला भोपळा फोडता आला नव्हता. मागील 2-3 दिवसांपासून लालू सकाळी नाश्ता करत असले तरीही दुपारच्या वेळेस जेवत नाहीत, थेट रात्री खात असल्याने त्यांना इन्सुलिन देण्यास अडचण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लालूंची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशाप्रकारे आहार सोडून देणं त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. वेळेत आहार न केल्यास त्यांना औषधै आणि इन्सुलिन देणे अवघड ठरेल.




