Vice President post : देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा काल २१ जुलै राजीनामा दिला आहे. काही तासांमध्ये त्यांचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्विकारणार का? हे स्पष्ट होणार आहे. यामुळे देशाच्या नव्या उपराष्ट्रपदी पदावर कोण विराजमान होणार? याची देशभरात चर्चा सुरू आहे. या पदासाठी अनेक नेत्यांची नावे आघाडीवर असून, यामध्ये महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी काल रात्री उशिरा म्हणजेच साधारण १० वाजता आपल्या उपराष्ट्रपदी पदाचा राजीनामा दिला. ही बातमी वाऱ्यासारखी परसली. मात्र, प्रकृती ठीक नसल्याच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव देशाच्या उपराष्ट्रपदी पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केला जाऊ शकतो. राजीनाम्यात काय? धनखड यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याकडे राजीनामा पाठविला असून, या राजीनाम्यात त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण दिलेा आहे. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 74 वर्षीय धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली होती. कोण आहेत हरिभाऊ बागडे? हरीभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून 2014 ते 2019 पर्यंत काम पाहिले आहे. त्याआधी ते 1995 ते 99 या कालावधीत राज्याचे मंत्री देखील होते. तसेच त्यांनी 27 जुलै 2024 रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. आता त्यांची देशाच्या उपराष्ट्रपदी पदावर वर्णी लागणार का? हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : राजीनामा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी का? ; धनखड यांच्या आरोग्याच्या कारणावर विरोधकांकडून शंका