Shahnaz Gill : शहनाज गिलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्रीने पापारांझींवर व्यक्त केला संताप

Shahnaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल हिला हिंदी बिग बॅास या रियालटी शोमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने अनेक चित्रपट आणि त्याचबरोबर म्युझिक अल्बममध्ये अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली. शहनाज ही सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. मात्र, सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अभिनेत्री चर्चेत आली असून, यावर तिने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री शहनाज गिल हिला सोशल मीडियावरून फॅालोइंग करणारा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये उप्स हा क्षण कैद झाला आहे. काल रात्री शहनाज गिल आणि रॅपर हनी सिंग एका कार्यक्रमात एकत्र आले होते. जिथे चाहते तिला पाहून खूप आनंदी झाले होते आणि पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करू लागले.
View this post on Instagram
यावेळी तिने बॅाडीफिट शॅार्ट ड्रेस घातला होता, ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, हा ड्रेस खूपच शॉर्ट असल्यामुळे ती थोडी अनकम्फर्टेबल दिसत होती. वारंवार तिचा शॉर्ट ड्रेस ती नीट करत होती. यादरम्यान, शहनाजने फोटो आणि व्हिडीओ काढण्यास मनाई केली, तरीही तिचे कुणी ऐकले नाही. यामुळे आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर तिने संताप व्यक्त केला आहे. शहनाज लवकरच ‘सिंह विरुद्ध कौर २’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा : जगदीप धनखड यांचा राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला ; नवीन उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू





