जय दुधाणेने ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा दोन महिन्यातच घेतला निरोप; स्वत: सांगितले कारण

Jay Dudhane | स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम, अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता जय दुधाणे मुख्य भूमिकेत दिसत होते. या मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यातील अभिनेता जय दुधाणे दोन महिन्यातच या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा मोठा निर्णय घेण्यामागचे कारण देखील त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.
जय दुधाणेची पोस्ट
जयने आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे हा निर्णय घेतला असं त्याने सांगितलं आहे. ‘मी एका महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना गमावलं. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. आमचं खूप मोठं नुकसान झाले. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे मी यापुढे स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करू शकणार नाही.’
पुढे त्याने लिहिले की, ‘संपूर्ण कास्ट आणि चॅनेलसोबत काम करण्याचा हा अनुभव अतिशय सुंदर होता. तुम्ही या मालिकेवर असंच प्रेम करत राहाल अशी अपेक्षा. माझ्याकडून मालिकेला खूप खूप शुभेच्छा.” काही दिवसांपूर्वी जय दुधाणेवर दु:खाचा डोंगर कोसळला. जय दुधाणेच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा वैयक्तिक आघात झाला आहे. Jay Dudhane |
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेमध्ये जय दुधाणे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांकडून कौतुकाची थाप मिळाली. बिग बॉस मराठी सीझन 3 मधील स्पर्धक जय दुधाणे आणि विशाल निकम ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. त्यानंतर त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही आतुर होते. पण आता जय दुधाणेने या मालिकेतून निरोप घेतला आहे. तर अभिनेता संग्राम साळवीने या मालिकेत एन्ट्री घेतली आहे. Jay Dudhane |
हेही वाचा:
‘211 प्राध्यापकांनी भरली 2000 पदे…’ तामिळनाडूच्या अण्णा विद्यापीठात ”घोस्ट फैकल्टी” घोटाळा चर्चेत





