‘211 प्राध्यापकांनी भरली 2000 पदे…’ तामिळनाडूच्या अण्णा विद्यापीठात ”घोस्ट फैकल्टी” घोटाळा चर्चेत

Ghost Faculty Scam । तामिळनाडूच्या प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या अण्णा विद्यापीठ (चेन्नई) मध्ये ‘घोस्ट फॅकल्टी’ घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात प्राध्यापकांची बनावट नोंदणी करण्यात आली आहे. तब्बल 2000 पदांची आवश्यकता पूर्ण करणारे केवळ 211 प्राध्यापक आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यापैकी प्रत्येकाची एकाच वेळी अनेक कॉलेजांमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून नोंद आहे.
अण्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर वेलराज यांच्या म्हणण्यानुसार,संलग्नित महाविद्यालयांमध्ये नोंदणी केलेल्या ‘घोस्ट फैकल्टी’ ची संख्या 2023 मध्ये 191 वरून यावर्षी 211 झाली आहे. अरापोर इयाक्कम नावाच्या स्वयंसेवी संस्थेने विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या प्राध्यापक सदस्यांच्या डेटाची तपासणी केली तेव्हा ही समस्या पहिल्यांदा समोर आली.
एनजीओ अरापोर इयक्कमचे संयोजक जयराम व्यंकटेशन यांनी 2023-24 शैक्षणिक सत्रासाठी अण्णा विद्यापीठाशी संलग्नीकरण प्रक्रियेदरम्यान तामिळनाडूमधील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये कथित घोटाळ्यात कशी गुंतली होती हे स्पष्ट केले. विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की 352 पूर्णवेळ शिक्षक अनेक महाविद्यालयांच्या यादीवर सूचीबद्ध आहे, त्यापैकी काही एकाच वेळी 11 संस्थांशी संबंधित होते.’ असेही ते म्हणाले.
Ghost Faculty Scam । मान्यता मिळण्यासाठी अटी पूर्ण कराव्या लागतात
अभियांत्रिकी महाविद्यालयांना अण्णा विद्यापीठ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) कडून संलग्नता किंवा मान्यता मिळविण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात, जसे की पुरेशी पायाभूत सुविधा, चांगल्या प्रयोगशाळेच्या सुविधा आणि पुरेशा पात्र शिक्षकांची संख्या. एनजीओने असा दावा केला आहे की विविध अभियांत्रिकी महाविद्यालये आणि प्राध्यापक, अण्णा विद्यापीठ आणि एआयसीटीईच्या संगनमताने, या सेट मानदंडांची पूर्तता करण्यासाठी अयोग्य पद्धतींचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होत आहे.
ही कथित फसवणूक थांबवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत एनजीओने दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाकडे तक्रार केली आहे. या खुलाशानंतर राज्य सरकारने कथित ‘घोस्ट फैकल्टी’ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. अण्णा विद्यापीठ, तामिळनाडू सरकार आणि एआयसीटीईच्या सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीला आठवडाभरात आपला तपास अहवाल सादर करावा लागणार आहे.
Ghost Faculty Scam । बनावट नोंदणीद्वारे 2000 पदे भरली
अण्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेलराज म्हणाले की, ‘जर प्राध्यापक बनावटगिरी आणि इतर संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई केली जाईल. अण्णा विद्यापीठाच्या वेबसाईटनुसार, सध्या त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये 52,500 प्राध्यापकांची नोंदणी आहे. मात्र, प्रत्यक्ष प्राध्यापकांची संख्या केवळ 50,500 असून, त्यापैकी 2000 पदे बनावट नोंदणीद्वारे भरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ऑनलाइन तपशील प्रकाशित करण्याच्या सक्तीमुळेच या अनियमितता आढळून आल्याचे कुलगुरू म्हणाले.’





