Jagannath Temple : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार 39 वर्षांपासून कुलुपबंद, भांडारात 400 किलो सोनं-चांदी, कुठं आहे किल्ली?

भुवनेश्वर – सुमारे 900 वर्षांचा इतिहास असलेल्या ओरिसातील जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार गेली 40 वर्षे बंदच आहे या रत्नभंडारात सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा कोट्यावधी रुपयांचा खजिना पडून आहे 1984 मध्ये हे रत्नभांडार खोलण्यात आले होते त्यानंतर हे रत्न भंडार बंदच आहे या रत्न भंडारात 400 किलो सोने आणि दीडशे किलो चांदी असावी असा एक अंदाज आहे. या भांडारातील आतल्या भागाच्या कुलुपाची किल्ली कुणाकडे आहे, याची माहितीच कुणाला नसल्याचं सांगण्यात येतयं सरकारने हे रत्नभांडार खुले करण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी ओरिसातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजप यांनी केली आहे.
हा विषय न्यायालयात गेला असून उच्च न्यायालयाने ओरिसा सरकारला 10 जुलैपर्यंत याबाबत उत्तर मागितले आहे अनेक वर्ष चर्चेचा विषय असलेल्या या रत्न भंडाराचे दोन भाग असून बाहेरच्या दर्शनी भागांमध्ये मंदिरातील विविध देवदेवतांचे दागिने ठेवण्यात आले आहेत तर या रत्न भंडाराच्या आतील भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचा खजिना आहे या दोन भागांपैकी बाहेरच्या भागाची कुलपाची चावी उपलब्ध आहे पण आतल्या भागाची कुलपाची चावी उपलब्ध नसल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे त्यामुळे हे रत्न भंडार खुले करण्यात अडचणी येत आहेत जगन्नाथ पुरीच्या मंदिराला भेट देणारे भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर दानधर्म करत असतात.
हा दानधर्म अनेक वेळा सोने आणि चांदी स्वरूपात असतो सोने चांदीच्या या सर्व वस्तू या रत्न भांडारातच ठेवल्या जातात पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये रत्न भंडाराची मोजणी करण्यात आलेली नाही 1978 मध्ये या रत्न भंडारातील खजिन्याची मोजणी करण्यात आली होती त्यानंतर 1984 मध्ये पुन्हा एकदा हे भांडार उघडण्यात आले होते पण गेल्या 40 वर्षांमध्ये ते उघडण्यात आलेले नाही 1984 मध्ये रत्नभंडार खोलण्यात आल्यावर जी माहिती उपलब्ध झाली होती ती सार्वजनिक करण्यात आली नसल्याने या खजिन्यामध्ये आता किती मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी आहे.
याबाबत कोणता अधिकृत तपशील उपलब्ध नाही सरकारनेही ती माहिती जाहीर केलेली नाही रत्न भंडारा आतील आतील कक्षाची हरवलेली चावी शोधण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती पण अद्यापही ती चावी शोधण्यात कोणाला यश आलेले नाही अनधिकृत माहितीप्रमाणे या रत्न भंडारात एकूण सात कक्ष आहेत पण 2 कक्षांचीच आत्तापर्यंत चर्चा झाली आहे.
उरलेल्या पाच कक्षांमध्ये यापेक्षाही मोठ्या प्रमाणात खजिना असेल अशी एक शक्यता व्यक्त होत आहे या आतील कक्षाची एक डुप्लिकेट चावी उपलब्ध असल्याची माहिती ही समोर आली होती पण राज्य सरकारने आदेश देईपर्यंत जगन्नाथ पुरी मंदिराचे प्रशासन हा कक्ष उघडण्याचा निर्णय घेणार नाही हे रत्न भंडार उघडण्याचा निर्णय सरकार का घेत नाही आणि या रत्न भंडाराचे ऑडिट का केले जात नाही असा सवाल आता विरोधी पक्षांनी विचारायला सुरुवात केली आहे येत्या दिवसांमध्ये हा विषय अधिकच पेटण्याची शक्यता दिसत आहे.





