Jadumani Boxing Silver : भारताच्या जादुमणी सिंहने बॉक्सिंमध्ये पटकावले रौप्य पदक! उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या बॉक्सरला चारली धूळ
Jadumani Boxing Silver : ५५ किलो गटातील बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत भारताच्या जादुमनी सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

Jadumani Singh Wins Silver Medal Boxing Mens Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) शनिवारी ५५ किलो गटातील बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत भारताच्या जादुमनी सिंह (Jadumani Singh) याला रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावे लागले आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या आणि थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जय डिक्सनने (Jai Dixon) जादुमनीचा ५-० असा पराभव केला. जादुमनीने रिंगमध्ये सुवर्णपदकासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली, परंतु डिक्सनच्या अचूक काउंटर-पंच आणि भक्कम बचावापुढे त्याला हार पत्करावी लागली.
पहिल्या राऊंडमध्ये जादुमनीची आघाडी –
सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन बॉक्सर जय डिक्सन थोडा सावध खेळताना दिसला. जादुमनी सिंहने हळूहळू आपली लय पकडत पहिल्या फेरीच्या अंतिम क्षणांमध्ये काही जोरदार अन् अचूक पंच मारले. जादुमनीच्या या आक्रमक फिनिशने प्रभावित होऊन पंचांनी ३-२ अशा स्प्लिट निर्णयाने पहिली फेरी जादुमनीच्या बाजूने दिली.
ऑस्ट्रेलियन खेळाडूचे दमदार पुनरागमन –
A Silver Medal earned through grit & an unforgettable journey.
Congratulations to Jadumani Singh Mandengbam on winning Silver Medal in the Men’s 55 kg Boxing event at the #Glasgow2026 Commonwealth Games.
Proud of you!!#Cheer4Bharat #CWG2026 pic.twitter.com/pszrSPEDl4
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 1, 2026
दुसऱ्या फेरीत डिक्सनने जोरदार पुनरागमन केले. जादुमनीने जेव्हा लेफ्ट हुकने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डिक्सनने वेळेवर अचूक काउंटर अटॅक केले. अत्यंत बरोबरीच्या राहिलेल्या या फेरीत डिक्सनच्या प्रभावी पंचांमुळे पाचही जजने ५-० असा कौल त्याच्या बाजूने दिला, ज्यामुळे तिसरी फेरी अत्यंत निर्णायक ठरली.
अंतिम फेरीत झुंज अपयशी; ‘रौप्य’पदकावर मानावे लागले समाधान –
Watch: Boxer Jadumani (55kg), who won the silver medal at the Commonwealth Games 2026, says, “I gave my all in this competition to win gold, but there were some shortcomings. I will work on those and overcome them, and in the upcoming Asian Games, I will bring a gold medal for… pic.twitter.com/N9UKDr14dG
— IANS (@ians_india) August 1, 2026
निर्णायक फेरीत जादुमनीने आक्रमक पवित्रा घेत डिक्सनवर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिक्सनने संयम राखत अचूक पंच मारणे सुरु ठेवले. सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदात जादुमनीने अनेक पंच मारले, पण पंचांचा निकाल बदलण्यासाठी ते पुरेसे ठरले नाहीत.
अखेर जय डिक्सनला सर्वसंमतीने (Unanimous Decision) विजेता घोषित करण्यात आले आणि जादुमनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी जादुमनीने पाकिस्तानच्या सुमामा रहमानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.





