पुणे जिल्हा | जिल्हा ग्रामसेवा पतसंस्थेच्या कार्यलक्षी संचालकपदी जाधव, दुधाळ
Updated On:

आंबेठाण, (वार्ताहर) – पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या कार्यलक्षी संचालपकपदी खेड पंचायत समितीच्या ग्रामविकास अधिकारी निलिमा प्रकाश जाधव, मुळशी पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी विनोद भीमराव दुधाळ यांची निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेची सभा पुण्यात बुधवारी (दि. 29) आयोजित करण्यात आली होती. यात जाधव, दुधाळ यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन घटना दुरुस्ती समितीचे अध्यक्ष तथा तज्ज्ञ संचालक अनिल कुंभार, पुणे विभागीय उपाध्यक्ष व संचालक अमोल घोळवे,
पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, कार्याध्यक्ष तथा संचालक संदीप ठवाळ, पतसंस्था अध्यक्ष संतोष निंबाळकर, सचिव पद्माकर डोंबाळे, उपाध्यक्ष छाया साकोरे, संचालक देवदत्त सांडभोर, संचालक प्रदीप खिलारे व सारिका टाकळकर आदी उपस्थित होते.





