‘आरबीआय’च्या कार्यकारी संचालकपदी नीरज निगम

मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नीरज निगम यांची कार्यकारी संचालक म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे, असे आरबीआयच्या एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संचालक म्हणून, निगम हे ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभाग, आर्थिक समावेशन आणि विकास विभाग, कायदेशीर विभाग या विभागाचे काम पहातील. पदोन्नती होण्यापूर्वी निगम हे आरबीआयच्या भोपाळ प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख होते.
निगम यांनी तीन दशकांहून अधिक काळ, नियमन आणि पर्यवेक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन, परिसर, चलन व्यवस्थापन, बॅंक खाती आणि रिझर्व्ह बॅंकेतील इतर विभागांमध्ये तसेच प्रादेशिक कार्यालयांमध्ये काम केले आहे.
निगम यांनी बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे त्याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग अँड फायनान्सचे प्रमाणित सहयोगी म्हणून व्यावसायिक पात्रता प्राप्त केली आहे.



