मुंबई – बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या दमदार अभिनयाने हॉलीवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील हॉलीवूडला जाण्यासाठी सज्ज झाली आहे. जॅकलिनने नुकताच पहिल्या हॉलीवूड प्रोजेक्ट साइन केला आहे.
View this post on Instagram
जॅकलिनच्या या हॉलीवूड चित्रपटाला “वुमेन स्टोरीज’ असे नाव देण्यात आले आहे. हा एक ऍथोलॉजी फीचर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट सहा भागांमध्ये सहा महिला दिग्दर्शकांकडून निर्मित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांची विशेष कर्तबगारी दाखविण्यात येणार आहे. लीना यादव निर्मित चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस झळकणार असून “शेअरींग अ राइड’ असे त्याचे नाव आहे.
View this post on Instagram
यात जॅकलिनबरोबर ट्रान्सजेंडर मॉडेल अंजली लामासुद्धा मुख्य भूमिका साकारत आहे. लीना यादव यांनी यापूर्वी “शब्द’, “तीन पत्ती’ आणि “राजमा चावल’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास जॅकलिन फर्नांडिसकडे सध्या अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. ती लवकरच “बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमारसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय “सर्कस’, “अटॅक’ आणि “किक-2’मध्ये देखील जॅकलिन काम करत आहे.
View this post on Instagram