जॅकी श्रॉफ ‘चिड़िया उड़’ वेबसीरिजद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ट्रेलर रिलीज

Chidiya Udd | अभिनेते जॅकी श्रॉफ ‘चिडिया उड’ या वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. नुकतेच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासोबतच रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘चिडिया उड’ या वेब सीरिजमध्ये सिकंदर खेरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या वेबसीरिजची कथा १९९० च्या दशकातील मुंबईतील भयानक जगावर आधारलेली आहे. त्यात अंडरवर्ल्ड, वेश्याव्यवसायाच्या दुनियेतील अनामिक गल्ल्या, खेड्यातील मुलींच्या वेदना आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड असणारी कथा दाखवण्यात आली आहे.
‘चिडिया उड’ ही वेबसिरिज आबिद सुर्ती यांच्या ‘केज’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. जॅकी श्रॉफ खलनायक तर भूमिका मीना मुख्य भूमिकेत आहे. यात सिकंदर खेरसह मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
बावेजा स्टुडिओच्या बॅनरखाली बनलेली ‘चिडिया उड’ वेबसीरिज १५ जानेवारी, २०२५ रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या सबस्क्रिप्शनची गरज नाही. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येणार आहे.
दरम्यान, जॅकी श्रॉफ हे नुकताच रिलीज झालेल्या ‘बेबी जॉन’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. यात वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. मात्र हा चित्रपत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आता हा जॅकी श्रॉफ ‘चिडिया उड’ वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा:





