Actress Prajakta Mali : जणू सौंदर्यांची खान… प्राजक्ताच नवं फोटोशूट पाहिलंत का? फोटो पाहून प्रेमात पडाल!

Actress Prajakta Mali : मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिच्याकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमी तिच्या सोशल मीडियावरून हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिच्या मनमोहक सौंदर्यांने तरुणांना घायाळ केले आहे. आता नुकतीचे केलेल्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे.
अभिनेत्री प्राजक्ताने सोनेरी रंगाच्या ऑरेग्जा साडीतील काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. या लूकसाठी प्राजक्ताने पारंपारिक दागिने परिधान केल्याचे दिसत आहे. डोक्यावर पदर असा प्राजक्ताचा लूक चाहत्यांना खूपच आवडवला आहे. प्राजक्ताने या फोटोंना लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
‘प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज… मोती संच… ह्यानिमित्ताने माझी आवडती गहू माळ संचात आलीए.. जी मी “फुलवंती” चित्रपटात परिधान केली होती.’ असं कॅप्शन तिने दिले आहे. या फोटोंमध्ये तिने मोतीगहूमाळ, मौक्तिकमाळा असा साजश्रृंगार केल्याचे दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांकडून तिच्या सौंदर्यांचे कौतुक करण्यात आले आहे. प्राजक्ताने बिझनेसवूमन म्हणून दागिन्यांच्या व्यावसायात आपला जम बसवला आहे. ‘प्राजक्तराज’ च्या दागिना ब्रँडच्या माध्यमातून तिने इतिहासकालीन दागिने प्रेक्षकांसमोर आणले आहेत.





