बारसं झालं.! विकी-कतरिनाने जाहीर केले मुलाचे नाव; ‘उरी’ सिनेमाशी आहे खास कनेक्शन

Vicky Kaushal | Katrina Kaif – बॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी-अभिनेत्री कतरिना कैफ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आई-बाबा झाले. तेव्हापासून त्यांचे चाहते बाळाचे नाव काय असेल, याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, बाळाच्या जन्मानंतर बरोबर दोन महिन्यांनी कतरिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलाच्या नावाची घोषणा केली आहे.
कतरिना आणि विकीने आपल्या लाडक्या लेकाचे नाव ‘विहान कौशल’ (Vihaan Kaushal) असे ठेवले आहे. कतरिनाने ही आनंदाची बातमी शेअर करताना लिहिले की, “आमचा लाडका विहान कौशल… आमच्या प्रार्थनांना यश मिळाले. त्याच्या येण्याने आमचे आयुष्य सुंदर झाले असून अवघे जग एका क्षणात बदलले आहे. मी केवळ कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते.” असं अभिनेत्रीने म्हंटलं आहे.
View this post on Instagram
‘विहान’ नावाचा अर्थ आणि महत्त्व :
‘विहान’ हे एक संस्कृत नाव असून त्याचे अर्थ अतिशय सुंदर आहेत. पहाट, सूर्योदय किंवा सकाळचा प्रकाश असा याच अर्थ आहे.
विकीच्या ‘उरी’ चित्रपटाशी खास कनेक्शन :
विशेष म्हणजे, ‘विहान’ या नावाचे विकी कौशलच्या करिअरशी एक खास नाते आहे. २०१९ मध्ये आलेल्या विकीच्या ब्लॉकबस्टर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात त्याच्या पात्राचे नाव ‘मेजर विहान सिंह शेरगिल’ होते. या योगायोगामुळे चाहते अधिकच खुश झाले असून, “विकीने आपल्या सुपरहिट भूमिकेचे नाव मुलाला दिले,” अशा कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.
४२ व्या वर्षी कतरिनाने दिले बाळाला जन्म :
विकी आणि कतरिनाचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये एका शाही सोहळ्यात पार पडले होते. लग्नानंतर चार वर्षांनी, म्हणजेच वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिनाने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. मुलाच्या जन्मानंतर विकीने ‘Blessed’ असे कॅप्शन देत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.





