ISSF Jr. World C’ship 2024 : भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर…

ISSF Junior World Championship 2024 : मुकेश नेलावल्ली, राजवर्धन पाटील आणि हरसिमार सिंग राथा यांच्या भारतीय संघाने ISSF जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक ( Men’s 25m Rapid Fire Pistol team event.) स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
या स्पर्धेतील भारताचे हे 11 वे सुवर्णपदक आहे. एकूण 16 पदकांसह भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताने एक रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आहेत. तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे.
Day 6⃣ Update: World Junior #Shooting🔫 Championships, Lima, Peru🇵🇪☑️
The trio of Mukesh Nellavalli, Raajwardhan Patil & Harsimar Singh Rattha secured a #Gold medal 🥇in Men’s 25m Rapid Fire Pistol team event.
Well done, champs 👏🏻 pic.twitter.com/sOzG2EaaID
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2024
मुकेशचे हे स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे. त्याने 25 मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकले. मुकेश आणि राजवर्धन या दोघांनीही 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुलच्या वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला परंतु तेथे त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. अंतिम फेरीत राजवर्धन चौथ्या तर मुकेश पाचव्या स्थानावर राहिला.
पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत, परीक्षित सिंग ब्रार हा 623.0 गुणांसह भारतीय खेळाडूंमध्ये सर्वोत्तम ठरला. तो पाचव्या स्थानी राहिला. तर शिवेंद्र बहादूर सिंग 618.4 गुणांसह 14व्या आणि वेदांत नितीन वाघमारे 613.2 गुणांसह 24व्या स्थानावर राहिला.





