34th Sub Jr. National Kho Kho Championship 2024-25 : – महाराष्ट्राच्या मुलीच्या संघाने कर्नाटक संघाला १८ गुणांनी पराभूत करताना ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या मुलींचे हे ७ वे विजेतेपद आहे. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगलीच्या वेदिका तामखडेला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुलांच्या गटातून महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते.
पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघासमोर कर्नाटक संघाचे आव्हान होते. महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटक संघाला २६-८ अशा गुणांनी सहज पराभूत केले. महाराष्ट्र संघाने मध्यंतराला १४-४ अशी १० गुणांची आघाडी घेतली होती.
IND vs BAN : कसोटी मालिका संपली! आता सुरू होणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी-कुठे होणार सामने?
महाराष्ट्राकडून वेदिका तामखडेने पहिल्या डावात ५ मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले १.३० मिनिट संरक्षण ३.५० मिनिट संरक्षण व ५ खेळाडू बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३ मिनिट संरक्षण करताना २ खेळाडू बाद केले तर गौरी जाधवने ३ खेळाडू बाद केले.
तर कर्नाटकच्या इंच्रा २, १.५ मिनिट संरक्षण करून ४ खेळाडूंना बाद केले व गौतमीने १, १.४० मिनिट संरक्षण करून चांगली लढत दिली. परंतू ही लढत कर्नाटक संघाला पराभवाचा[पासून वाचवू शकली नाही.