ISSF World Cup Cario : 12 वर्षांचा दुष्काळ संपला; रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ‘अनिश’ने पटकावले ब्रॉंझपदक

कैरो – आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालने तब्ल 12 वर्षांचा दुष्काळ संपवताना 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ब्रॉंझपदक पटकावले.
12 वर्षांपूर्वी या स्पर्धेत याच रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात विजय कुमारने देशाला पदक मिळवून दिले होते. यानंतर आता येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत अखेरच्या दिवशी अनिशने पदक प्राप्त केले.
अनिशचे वरिष्ठ स्तरावरील जागतिक स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले आहे. या प्रकारात इटलीच्या मॅसिमो स्पिनेलाने सुवर्णपदक तर, फ्रान्सच्या क्लेमेंट बेसागुएटाने रजकपदक मिळवले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/pat-cummins-to-miss-third-test-steve-smith-will-lead/
राष्ट्रीय सराव सत्रात दबावाखाली कशी कामगिरी करायची हे शिकलो. या सामन्यात चौथी फेरी कठीण होती. मात्र, एका ऑलिम्पिकपटूला पराभूत करण्यात यश आले व पदक मिळवता आले त्याचाच आनंद जास्त आहे, असे अनिशने सांगितले.





