Israeli Prime Minister : इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांची तब्येत बिघडली
Updated On:

जेरुसलेम, (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यांना काल अचानक अस्वस्थ वाटायला लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तेल अविवचे उपनगर असलेल्या रामत गान येथील शेबा मेडिकल सेंटरमध्ये 73 वर्षीय नेत्यान्याहू यांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र किरकोळ तपासण्यांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अचानक काय त्रास व्हायला लागला होता आणि त्याचे काय निदान झाले, ही माहिती उघड करण्यात आलेली नाही.
नेत्यान्याहू यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार ठरणार आहेत, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.





