Israel US Iran War: खामेनी यांचे पुत्र मोजताब बनले इराणचे नवे सर्वोच्च नेते ; इराणकडून अधिकृत घोषणा नाही
Israel US Iran War: इराण विरुद्ध अमेरिका - इस्रायल युद्धादरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष आयातुल्ला अली खामेनी यांचा अंत झाला. त्यानंतर आता इराणला एक नवीन सर्वोच्च नेते मिळाले आहेत.

Israel US Iran War: इराण विरुद्ध अमेरिका – इस्रायल युद्धादरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष आयातुल्ला अली खामेनी यांचा अंत झाला. त्यानंतर आता इराणला एक नवीन सर्वोच्च नेते मिळाले आहेत.
इराणच्या विशेष सभेने अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची देशाचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड केलीय. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. Israel US Iran War:
तेव्हापासून, हे पद पुन्हा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र , नवीन नेते म्हणून मोजतबा यांची निवड करण्याचा निर्णय इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली घेण्यात आला होता असं म्हटलं जातंय.
२८ फेब्रुवारी रोजी, अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी इराणवर हल्ला केला आणि त्या रात्री इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांची हत्या केली. प्रत्युत्तर म्हणून, इराणने सात आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करून हल्ले केले. यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत अशांततेची लाट उसळली.
इराण इंटरनॅशनल आणि इतर माध्यमांमधील वृत्तांनुसार, ८८ वरिष्ठ धर्मगुरूंचा समावेश असलेल्या तज्ञांच्या सभेने ५६ वर्षीय मोजताब खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली.
दरम्यान, इराणच्या सरकारी वृत्तसंस्था फार्सनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मशहदमध्ये दफन केले जाणार आहे असे संग्न्येत येत आहे. Israel US Iran War:
तारीख आणि तारखेची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, खामेनी यांना इमाम रझा (शांतता असो) यांच्या दर्ग्याजवळ अंत्यसंस्कार केले जातील. खामेनी यांचा जन्मही १९३९ मध्ये मशहदमध्ये झाला होता.






