Israel strikes two schools in Iran: इस्रायलचा इराणमधील दोन शाळांवर हल्ला; 85 ठार, 63 जखमी
Israel strikes two schools in Iran: उल्लेखनीय म्हणजे, जून २०२५ मध्ये अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धातही नागरिकांची मोठी जीवितहानी झाली होती.

Israel strikes two schools in Iran: इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणमधील दोन शाळांना लक्ष्य करण्यात आले असून या हल्ल्यांत आतापर्यंत ८५ जण ठार आणि ६३ जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक बळी दक्षिण इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यात गेले आहेत.
इराणच्या हॉर्मोझगान प्रांतातील मिनाब शहरातील एका प्राथमिक कन्याशाळेवर शनिवारी इस्रायलने हल्ला केला. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने मिनाबच्या न्यायव्यवस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात मृतांची संख्या ८५ वर पोहोचली असून मलबा उपसण्याचे काम अद्यापही सुरू आहे. तेहरानच्या पूर्वेकडील एका शाळेवर झालेल्या वेगळ्या हल्ल्यात किमान दोन विद्यार्थी ठार झाल्याचे इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी हल्ल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करत “निर्दोष मुलांचा” बळी घेणाऱ्या या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला. “इराणी जनतेविरुद्धच्या या गुन्ह्यांचे उत्तर दिले जाईलच,” असा इशाराही त्यांनी दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी या “उघड गुन्ह्या”चा निषेध करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
The destroyed building is a primary school for girls in the south of Iran. It was bombed in broad daylight, when packed with young pupils.
Dozens of innocent children have been murdered at this site alone.
These crimes against the Iranian People will not go unanswered. pic.twitter.com/AVqiuolgWm
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) February 28, 2026
अल् जझीरेचे तेहरान प्रतिनिधी मोहम्मद वल यांनी सांगितले की, या हल्ल्यांमुळे “आम्ही केवळ लष्करी लक्ष्यांवरच हल्ले करतो” या अमेरिका व इस्रायलच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणी जनतेला मदतीचे आश्वासन दिले होते; मात्र नागरिकांचे बळी जाणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा मुद्दा इराण सरकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जोरकसपणे मांडेल, असे वल यांनी नमूद केले. शाळांवरील हल्ल्यांबाबत अमेरिका किंवा इस्रायलकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा – ‘खूप चिंतेचा विषय’! इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांवर भारताची पहिली प्रतिक्रिया
उल्लेखनीय म्हणजे, जून २०२५ मध्ये अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धातही नागरिकांची मोठी जीवितहानी झाली होती. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, त्या संघर्षात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते किंवा जखमी झाले होते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले होते.





