US-Israel Attacks Iran: “सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा
US-Israel Attacks Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की वाटाघाटी अयशस्वी झाल्यास इराणवर हल्ला होऊ शकतो. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे शनिवारी इराणमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इराणने तातडीने आणीबाणी घोषित केली असून संपूर्ण प्रदेशात तणाव वाढत चालला आहे.

US-Israel Attacks Iran: इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी तातडीने सतर्कता इशारा जारी केला आहे.
दूतावासाने काय सांगितले? (US-Israel Attacks Iran)
दूतावासाने X वर पोस्ट करत सांगितले की, “सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावध राहावे आणि इस्रायली (Israel )अधिकारी तसेच होम फ्रंट कमांडच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.” पुढील सूचना येईपर्यंत इस्रायलमध्ये कोणताही अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या घर किंवा कार्यालयाजवळील सुरक्षित आश्रयस्थानाची माहिती आधीच करून घ्यावी, स्थानिक बातम्या आणि अधिकृत घोषणांवर सतत लक्ष ठेवावे, असेही दूतावासाने स्पष्ट केले. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक दूतावासाच्या २४ तास उपलब्ध हेल्पलाइनवर संपर्क करू शकतात.
ADVISORY
In view of the prevailing security situation in the region, all Indian nationals in Israel are advised to exercise utmost caution and remain vigilant at all times.
2. Indian nationals are strongly advised to strictly adhere to the safety guidelines and instructions… pic.twitter.com/SOvzAdLMwn— India in Israel (@indemtel) February 28, 2026
विमानसेवा विस्कळीत – (US-Israel Attacks Iran)
इस्रायलने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या उड्डाणांवर थेट परिणाम झाला. २८ फेब्रुवारीला दिल्लीहून तेल अवीवला निघालेले AI139 हे विमान मध्येच माघारी वळवावे लागले. तेहरान हवाई क्षेत्रही १२०० UTC पर्यंत बंद असल्याने दिल्ली-तेल अवीव मार्गावरील दोन्ही उड्डाणे प्रभावित झाली आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की वाटाघाटी अयशस्वी झाल्यास इराणवर हल्ला होऊ शकतो. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे शनिवारी इराणमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इराणने तातडीने आणीबाणी घोषित केली असून संपूर्ण प्रदेशात तणाव वाढत चालला आहे.





