Air India : एअर इंडिया पुन्हा चर्चेत.! विमान रनवेवर उतरणार तितक्यात घडली मोठी घटना

Air India – अमृतसर ते बर्मिंघम जाणा-या एअर इंडिया फ्लाइट एआय ११७ चे लँडिंग होण्यापूर्वी अचानक इमरजेंसी सिस्टम एक्टिव झाले. ज्यानंतर बर्मिंघम एअरपोर्टवर हे विमान आपत्कालीन स्थितीत लँडिंग करण्यात आले.
या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत. ही घटना प्लेनची लँडिंग प्रक्रिया सुरू असताना झाली. जेव्हा विमान रनवेवर उतरणार होते तितक्यात ही घटना घडली. या घटनेबाबत एअर इंडियाने निवेदनही जारी केले आहे.
एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे की, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अमृतसरहून बर्मिंघमला जाणारी फ्लाईट एआय ११७ मध्ये ऑपरेटिंग क्रू ला लँडिंगपूर्वी आरएटी डिप्लॉयमेंटची माहिती मिळाली. तपासात सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामीटर सामान्य आढळले.
हे विमान सुरक्षित लँडिंग करण्यात आले. कुठलाही तांत्रिक बिघाड नोंदवला नाही. मानक कार्यपद्धती नुसार, सविस्तर तपासणीसाठी विमानाची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या विमानाचे परतीचे उड्डाण, एआय ११४ (बर्मिंगहॅम ते दिल्ली) रद्द करण्यात आले आहे.
तसेच एअर इंडियाकडून ज्या प्रवाशांचे परतीचे उड्डाण रद्द झाले आहे त्यांच्यासाठी पर्यायी उड्डाण अथवा राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आमचे प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. सर्व यंत्रणा सामान्य आहेत, परंतु कोणत्याही संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी संपूर्ण तांत्रिक तपासणी सुरू आहे.





