‘ते’ शिवरायांबाबत बोलत नाही? राज ठाकरेंच्या आरोपवार शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर

Updated On:

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  घणाघाती टीका केली. शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेखही राज यांनी आपल्या भाषणामध्ये केला.  तसेच शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलत नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर  आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले,’राज ठाकरे यांनी मी भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असा दावा केला. राज ठाकरे यांनी माझे  दोन दिवसांपूर्वीचे अमरावती येथे केलेले भाषण ऐकावे. मी अमरावतीतील सभेत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर २५ मिनिटांचं भाषण केलं होतं. मी केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबाबतच बोलतो असेही ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर ही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आस्था असलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यामुळे या तिघांबाबत उल्लेख करणं हे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे. असं म्हणत शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

2026-10-08 09:23:00

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा