#ISL : जमशेदपूरवर मात करत एटीके अव्वलस्थानी

नवी दिल्ली : दोन वेळच्या चॅम्पियन एटीके संघाने रविवारी इंडियन सुपर लीग स्पर्धेतील फुटबाॅल सामन्यात यजमान जमेशदपूर एफसी संघाचा ३-० ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह एटीके संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावलं आहे.
That's a first-ever win in Jamshedpur sealed by @ATKFC! 🙌#JFCATK #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/syqk5ppnZV
— Indian Super League (@IndSuperLeague) February 2, 2020
जेआरडी टाटा स्पोर्टस काॅम्पलेक्समध्ये झालेल्या सामन्यात एटीके संघाडून राॅय कृष्णाने दुस-या व ७५ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर इदु गार्सियाने ५९ व्या मिनिटांला एक गोल केला.
एटीके संघाचा १५ व्या सामन्यातील हा ९ वा व सलग तिसरा विजय आहे. त्यांचा संघ ३० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. जमशेदपूर संघाचा १४ सामन्यातील हा ६ वा पराभव आहे. त्यांचा संघ १६ गुणासह गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहे.




