#ISL : एफसी गोवाचा केरला ब्लास्टर्सवर शानदार विजय

नवी दिल्ली : हुगो बोउमोसच्या दोन आणि जैकीचंद सिंहच्या एक गोलच्या जोरावर एफसी गोवाने शनिवारी इंडियन सुपर लीगमध्ये चालू सत्रातील आपल्या १४ व्या सामन्यात केरला ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव करत शानदार विजय मिळविला. या विजयासह एफसी गोवाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे.
.@FCGoaOfficial survive a scare against @KeralaBlasters to return to winning ways!#FCGKBFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/Df7XpfSxHO
— Indian Super League (@IndSuperLeague) January 25, 2020
एफसी गोवा संघाकडून हुगो बोउमोसने २६ व्या मिनिटाला पहिला तर (४५+१) मिनिटाला जैकीचंद सिंहने दुसरा आणि पुन्हा एकदा हुगो बोउमोसने ८३ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. केरला ब्लास्टर्सकडून मेसीने ५३ व्या मिनिटाला आणि कर्णधार ओग्बेचेने ६९ व्या मिनिटाला गोल केला.
या विजयासह एफसी गोवा संघाचे १४ सामन्यात ८ विजयासह २७ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचले आहेत. दुसरीकडे केरला ब्लास्टर्सचा हा ६ वा पराभव असून ते गुणतालिकेत ८ व्या स्थानी कायम आहेत.




