Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगरसेवक सुनील मलगुंडे अपात्र; शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के
Ishwarpur News : Ishwarpur News : ईश्वरपूर शहरामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवले होते.

Ishwarpur News : ईश्वरपूर शहरामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र ठरवल्याचा आदेश जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी आज दिला. (Ishwarpur News)
दोघेही मलगुंडे बंधू अपात्र ठरल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना दुसरा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (Ishwarpur News)
याबाबत माहिती अशी, उरूण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांनी भूमापन क्र. ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब, ८/२ व ११ या मिळकतींमध्ये पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करुन बेकायदेशिर व अनधिकृत बांधकाम केले आहे. (Ishwarpur News)
अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी जयकर उर्फ घनश्याम जाधव यांनी माहिती अधिकारात घेतली. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे 2 फेब्रुवारी 2026 रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर 7 तारखा झाल्या. (Ishwarpur News)
जयकर जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भूअभिलेख विभागाचा अभिप्राय, इतर पुराव्यांचे परीक्षण केले. जिल्हाधिकारी कोणता आदेश देणार याकडे ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. (Ishwarpur News)
अखेर 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी उरूण- ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरविले. परंतु, या प्रकरणातील तक्रार दाखल असणारे प्रभाग क्र.13 चे नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्याबाबत काय निर्णय लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. (Ishwarpur News)
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम कलम ४४(१) (e) मधील तरतुदीनुसार बेकायदेशीर व अवैध बांधकाम प्रकरणी नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र केल्याचा आदेश सोमवार दि.13 जुलै रोजी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिला. (Ishwarpur News)
या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दुसरा धक्का बसला असून ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा निकाल मान्य नसल्यास राज्य शासनाकडे हा आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत अपिल दाखल करता येईल. असे आदेशामध्ये म्हटले आहे. (Ishwarpur News)
आणखी पाच नगरसेवक रडारवर
बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणखी पाच नगरसेवक रडारवर आहेत. त्याबाबत कागदपत्र जमा करण्याचे काम सुरु आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असा इशारा शिवसेनेचे नेते व माहिती अधिकार कार्यकर्ते घनश्याम जाधव यांनी दिला आहे. (Ishwarpur News)





