UPSC Result: घरी राहूनच केला अभ्यास; इशिता ‘अशी’ बनली यूपीएससी टॉपर

UPSC Result: इशिता किशोर (रोल क्रमांक 5809986) यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2022 परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे पर्यायी विषय घेऊन त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र (ऑनर्स) मध्ये पदवीधर आहेत.
UPSC CSE 2022 च्या परीक्षेत ऑल इंडिया टॉपर असलेल्या इशिता किशोर नेहमीच टॉपर राहिल्या आहेत. एअरफोर्स बालभारती स्कूल आणि दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकलेल्या इशिताने लहानपणीच ठरवलं होतं की आयएएस अधिकारी व्हायचे आहे.
तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले –
इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत आणि संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये राहते. इशिताने 2014 मध्ये बाल भारतीमधून तिचे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2017 मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्ससह पदवी पूर्ण केली. यूपीएससी परीक्षेतील त्यांचा हा तिसरा प्रयत्न होता.
वडिलांना पाहून केले लक्ष्य –
इशिता आज निकालाची वाट पाहत होत्या, पण त्यांना ऑल इंडिया टॉपर होईल याची कल्पना नव्हती. निकाल लागताच त्यांचे नाव सर्वत्र पसरले. ही गोष्ट त्यांनी आईला सांगितल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला. इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी असे काम करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.
घरी राहूनच केला अभ्यास –
इशिताने सांगितले की, त्यांनी यूपीएससीसाठी घरी राहूनच अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे वैकल्पिक विषय होते.
आज जाहीर झाला निकाल –
सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 2022, 05 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 11,35,697 उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी 5,73,735 उमेदवार परीक्षेला बसले होते. सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या लेखी (मुख्य) परीक्षेत एकूण 13,090 उमेदवार बसण्यास पात्र ठरले होते. एकूण 2,529 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. आज 23 मे रोजी अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
पहिले 10 टाॅपर –
1 इशिता किशोर
2 गरिमा लोहिया
3 उमा हरति एन
4 स्मृति मिश्रा
5 मयूर हजारिका
6 गहना नव्या जेम्स
7 वसीम अहमद भट
8 अनिरुद्ध यादव
9 कनिका गोयल
10 राहुल श्रीवास्तव





