इशिता दत्ताची तब्येत बिघडली; काही दिवसांपूर्वीच दिला लेकीला जन्म

Ishita Dutta | बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. चिमुकल्या लेकीचे तिच्या घरी आगमन झाले आहे. मात्र लेकीच्या जन्मानंतर इशिताची तब्येत बिघडली आहे. इशिताचं वजन पाहून अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली होती. त्यावर तिने आता सांगितले आहे.
इशितासोबत तिचा दोन वर्षांचा मुलगा वायूची देखील तब्येत खराब झाली आहे. यासोबत तिने एक फोटो देखील शेअर केला आहे. इशिता दत्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर हाताला सलाईन लावलेला फोटो दाखवला आहे.
View this post on Instagram
;
यासोबत तिने लिहिले, “हा महिना माझ्यासाठी खूपच कठीण होता. ज्यावेळी मी खरं तर माझ्या नवजात मुलीजवळ असलं पाहिले होतं त्यावेळी मी रुग्णालयात चकरा मारत होते. सुदैवाने मी आणि वायु आता बरे होत आहोत. अनेकांनी मला माझ्या वेट लॉसबद्दल विचारलं. पणकाही दिवसांपासून तब्येत खराब असल्याने माझं वजन कमी झाले आहे.” Ishita Dutta |
दरम्यान, इशिता दत्ताने १० जून रोजी मुलीला जन्म दिला. त्याच्या लेकीचे नाव वेदा ठेवण्यात आले आहे. इशिता दत्ताच्या कामाबद्द्दल बोलायचे झाले तर, ती ‘दृश्यम’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आली. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. Ishita Dutta |
हेही वाचा
“सोनिया गांधींनी हिंदूंची माफी मागावी…” ; मालेगाव ब्लास्टच्या निकालानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया





