Ishan Kishan Record : इशान किशनचा छोटा पॅकेट बडा धमाका! वादळी शतक ठोकत धोनी-गिलच्या खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
Ishan Kishan Record : इशान किशनने अफगाण गोलंदाजांची धुलाई करत शानदार शतक तर झळकावलेच, शिवाय वनडे कारकिर्दीतील आपले १,००० धावा देखील पूर्ण केल्या.

Ishan Kishan Record Fastest 1000 ODI Runs : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चाहत्यांना एक अविस्मरणीय खेळी पाहायला मिळाली आहे. लखनौच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय वनडे संघात प्रदीर्घ काळाने पुनरागमन करणाऱ्या इशान किशनने ( Ishan Kishan ) आपल्या बॅटचा जलवा दाखवला आहे. त्याने अफगाण गोलंदाजांची धुलाई करत शानदार शतक तर झळकावलेच, शिवाय वनडे कारकिर्दीतील आपले १,००० धावा देखील पूर्ण केल्या. यासह तो वनडेत सर्वात कमी चेंडूंत हा टप्पा गाठणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
इशानने ९६६ चेंडूंत गाठला हजाराचा टप्पा – (Ishan Kishan Record )
टी-२० मधील दमदार कामगिरीच्या जोरावर तब्बल तीन वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या इशानला धर्मशाला येथील पहिल्या सामन्यात केवळ ३४ धावा करता आल्या होत्या. मात्र, लखनौमध्ये त्याने कसर भरून काढली. इशानने वनडेत १,००० धावा पूर्ण करण्यासाठी अवघे ९६६ चेंडू घेतले. भारतासाठी सर्वात कमी चेंडूंत १,००० वनडे धावा करण्याचा विक्रम हार्दिक पंड्याच्या (८५७ चेंडू) नावावर आहे. या यादीत आता केदार जाधव (९३६), कपिल देव (९५४), शुबमन गिल (९५४) आणि एमएस धोनी (९५५) यांच्यानंतर इशान किशन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
७१ चेंडूंत शतक; रोहित आणि मॉर्गनच्या विशेष यादीत स्थान – (Ishan Kishan Record )
🚨 Milestone Unlocked 🚨
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs and counting in ODIs for Ishan Kishan 👏
Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/5H0W2ClfuB
— BCCI (@BCCI) June 17, 2026
इशान किशनने या सामन्यात केवळ ७१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले, जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. या वेगवान शतकासह तो अफगाणिस्तानविरुद्ध वनडेत सर्वात कमी चेंडूंत शतक ठोकणारा जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. या यादीत इंग्लंडचा इयॉन मॉर्गन (५७ चेंडू) पहिल्या, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (६३ चेंडू, २०२३) दुसऱ्या स्थानावर आहे. ईशानने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा (७६ चेंडू) रेकॉर्ड मोडत तिसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, याच सामन्यात शुबमन गिलनेही ७७ चेंडूंत शतक झळकावले आहे.
वनडे सामन्यांमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारे खेळाडू: (Ishan Kishan Record )
1️⃣2️⃣5️⃣ Runs
7️⃣9️⃣ Balls
1️⃣4️⃣ Fours & 7️⃣ SixesA dazzling knock from Ishan Kishan 👏👏
Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/EI68b2HLje
— BCCI (@BCCI) June 17, 2026
- इयॉन मॉर्गन (इंग्लंड) – ५७ चेंडू (मँचेस्टर, २०१९)
- रोहित शर्मा (भारत) – ६३ चेंडू (दिल्ली, २०२३)
- इशान किशन (भारत) – ७१ चेंडू (लखनौ, २०२६)
- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – ७६ चेंडू (मुंबई, २०२३)
- शुबमन गिल – ७७ चेंडू (लखनौ, २०२६)





