Ishan Kishan Record : इशान किशनने रचला इतिहास! धोनी-पंतला मागे टाकत ‘हा’ भीमपराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
Ishan Kishan Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या नामीबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यात इशान किशनने आपल्या बॅटीने अक्षरशः आग ओकली आहे.

Ishan Kishan record as 1st Indian wicketkeeper fifty T20 World Cup : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या नामीबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यात इशान किशनने आपल्या बॅटीने अक्षरशः आग ओकली आहे. फलंदाजीला अनुकूल असलेल्या या मैदानावर इशानने केवळ २४ चेंडूंत ६४ धावांची विस्फोटक खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडत भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे.
धोनीचा ‘तो’ विक्रम मोडत बनला पहिला भारतीय यष्टीरक्षक –
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नव्हते. इशान किशनने आज ही उणीव भरून काढली. इशानच्या आधी विश्वचषकात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या (४५ धावा) नावावर होता. इशानने ६४ धावा करत हा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. ऋषभ पंतने यष्टीरक्षक म्हणून ४२ धावांची खेळी केली होती, त्यालाही इशानने आता मागे टाकले आहे.
पॉवरप्लेमध्येच ठोकले अर्धशतक; रोहित-राहुलच्या पंक्तीत स्थान –
इशान किशनने नामीबियाच्या गोलंदाजांचा समाचार घेताना अवघ्या २० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्याने ही पन्नाशी पॉवरप्ले संपण्यापूर्वीच गाठली होती. टी-२० विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. त्याने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून युवराज सिंगच्या (२० चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००७) विक्रमाची बरोबरी केली आहे.
A blistering knock! 🔥
Ishan Kishan got to his half-century in style en route to 6️⃣1️⃣(24) 💪
Updates ▶️ https://t.co/SQLoaZjq98#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvNAM | @ishankishan51 pic.twitter.com/H2mLWp1SQD
— BCCI (@BCCI) February 12, 2026
टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी वेगवान अर्धशतके:
१. युवराज सिंग: १२ चेंडू (विरुद्ध इंग्लंड, २००७)
२. केएल राहुल: १८ चेंडू (विरुद्ध स्कॉटलंड, २०२१)
३. रोहित शर्मा: १९ चेंडू (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४)
४. इशान किशन / युवराज सिंग: २० चेंडू.
हेही वाचा – Mohammad Nabi Fine : पराभवानंतर अफगाणिस्तानला आयसीसीचा ‘दुहेरी’ धक्का! पंचाशी हुज्जत घातल्याने स्टार खेळाडूला ठोठावला दंड
भारताने २०९ धावांचा उभारला डोंगर –
या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. इशान किशनने ६ चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांच्या जोरावर भारताला वादळी सुरुवात करून दिली आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताने नामीबियासमोर ९ गडी गमावून २०९ धावांचा डोंगर उभा केला आहे, जो नामिबियासाठी सहजासहसी पार करणे शक्य नाही.






