Ishan Kishan Reaction : ‘ट्रॉफी फक्त मंदिरातच का नेली?’ कीर्ती आझाद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इशान किशन संतापला, पाहा VIDEO
Ishan Kishan Reaction : या धार्मिक दर्शनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य कीर्ती आझाद यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Ishan Kishan Reaction on Kirti Azad controversial post : भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी अहमदाबादमधील हनुमान टेकडी मंदिरात जाऊन ट्रॉफीसह दर्शन घेतले. या धार्मिक दर्शनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य कीर्ती आझाद यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना इशान किशन संतापला.
कीर्ती आझाद यांची टीका: “टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे”
कीर्ती आझाद यांनी या कृतीवर आक्षेप घेत म्हटले की, “भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे. खेळ आणि ही ट्रॉफी कोणत्याही एका विशिष्ट धर्माची नसून संपूर्ण राष्ट्राची आहे. संघात विविध धर्माचे खेळाडू आहेत, मग ही ट्रॉफी फक्त एकाच मंदिरात का नेण्यात आली? ती मशीद, चर्च किंवा गुरुद्वारात का नेली नाही?” आझाद यांच्या मते, टीम इंडिया केवळ ठराविक लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही, तर संपूर्ण भारताचे करते, जिथे सर्व धर्माचे लोक राहतात. यावर इशान किशनला पाटण्यात प्रश्न विचारण्यात आला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
SHAME ON TEAM INDIA! 😡
When we won the World Cup under Kapil Dev in 1983, we had Hindu Muslim Sikh and Christian in the team.
We brought the trophy to our religious birth place our motherland India Bharat Hindustan
Why The Hell Is The Indian Cricket Trophy is being Dragged.…
— Kirti Azad (@KirtiAzaad) March 9, 2026
इशान किशनचा पत्रकारांवर संताप –
Ishan Kishan cooked Kirti Azad 😂 pic.twitter.com/GWI7dWfTer
— Abhishek (@vicharabhio) March 10, 2026
विश्वचषक जिंकून आपल्या गावी पाटण्याला परतलेल्या इशान किशनला पत्रकारांनी या वादावर प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच इशान वैतागला आणि त्याने पत्रकारांनाच सुनावले. इशान म्हणाला, “आम्ही किती ऐतिहासिक कामगिरी करून विश्वचषक जिंकला आहे, तुम्ही किमान काहीतरी चांगले प्रश्न विचारले पाहिजेत. कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? तुम्ही हे विचारलं पाहिजे की आम्हाला किती मजा आली. तुम्ही फारच खराब प्रश्न विचारलात.” इशानने या वादावर अधिक बोलणे टाळत संघाच्या यशावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
इशानची विश्वचषकातील चमकदार कामगिरी –
इशान किशनने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ९ सामन्यांमध्ये ३५.२२ च्या सरासरीने ३१७ धावा कुटल्या. संजू सॅमसननंतर तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.





