SRH vs MI : इशान किशनचा ‘तो’ प्रामानिकपणा हैदराबादला पडला महागात, VIDEO होतोय तुफान व्हायरल

SRH vs MI Ishan Kishan’s Honest Mistake Costs Hyderabad : आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने खराब सुरुवातीनंतर हेन्रिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर १४३ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. मात्र, या सामन्यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना इशान किशनने मोठी चूक केली. तो आऊट न होताच पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इशान किशन आऊट न होताच पॅव्हेलियनमध्ये परतला –
खरंतर, दुसऱ्या षटकात इशान किशन फलंदाजीला आला. तो १ धावेवर फलंदाजी करत होता. २.१ षटकांत, इशान किशन दीपक चहरच्या गोलंदाजीवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. पण चेंडू इशानच्या बॅटला न लागता यष्टिरक्षक रायन रिकेलटनच्या ग्लोव्हजमध्ये जातो. यानंतर मुंबईचा कोणत्याच खेळाडूने अपील केले नाही. मात्र, पंचांनी अर्धवट हात वर केलेल्या पाहून, मुंबईच्या खेळाडूंनी अपील केले आणि पंचांनी आऊटचा निर्णय दिला. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे चेंडूचा इशानच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता. तरी देखील इशान डीआरएस न घेताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा हा प्रामाणिकपणा हैदराबादसाठी महागात पडला.
🚨 ISHAN KISHAN DISMISSAL MOMENT 🚨 pic.twitter.com/y75dm8v0bM
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
हैदराबादची फलंदाजी ठरली अपयशी –
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा हार्दिक पंड्याचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. हैदराबादने अवघ्या ६ षटकांत आपले ४ प्रमुख फलंदाज गमावले. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून आले आणि त्यांनी २ धावांची भागीदारी केली. हेड आपले खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला, तर अभिषेक शर्माने ८ चेंडूत ८ धावा केल्या. त्याच वेळी, ४ चेंडूत १ धाव करून इशान किशनही बाद झाला. ४.१ षटकात, नितीश रेड्डी देखील ६ चेंडूत २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबादने ६ षटकांत केवळ २४ धावा केल्यानंतर आपले ४ प्रमुख फलंदाज गमावले.
हेही वाचा – SRH vs MI सामन्यात शोकाकुल वातावरण; बीसीसीआयचा संवेदनशील निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी
यानंतर हेन्रिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांच्यातील ९९ धावांच्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबईसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने २० षटकांत आठ गडी गमावून १४३ धावा केल्या. त्यांच्याकडून क्लासेनने ७१ धावा आणि अभिनवने ४३ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने चार तर दीपक चहरने दोन विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, बुमराहने एक विकेट्स घेतली





