यो यो हनी सिंग ‘या’ मॉडेलला करतोय डेट? व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Honey Singh | प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. यातच आता हनी सिंगने एमा बकरसोबत वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यानंतर मोरोक्कन मॉडेल एमा बकरसोबतच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हनी सिंगने ‘जिंदगी एक खूबसूरत सफर है’ असे लिहून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एमा बकरला ‘क्लिओपेट्रा’ असे संबोधले असून, ‘लव्ह यू’ असेही लिहिले आहे. या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या असून चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत. Honey Singh |
View this post on Instagram
2024 मध्ये अबू धाबी येथे झालेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात हनी सिंग एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत रेड कार्पेटवर दिसला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Honey Singh |
हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशी विवाह केला होता. मात्र, 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर हनी सिंगचे नाव टीना थडानीसोबत जोडले गेले होते. आता एमा बकरसोबतच्या त्याच्या सततच्या पोस्टमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हनी सिंगने आपल्या या नव्या नात्याबाबत अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. Honey Singh |
हेही वाचा:





