हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Yo Yo Honey Singh | रॅपर यो यो हनी सिंगची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आगामी प्रोजेक्टशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो खूप चर्चेत राहिला. यातच आता त्याच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या डॉक्युमेंटरीतून हनी सिंगच्या संघर्षाची कहाणी पाहायला मिळणार आहे. ‘यो यो हनी सिंग फेमस’ या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केले आहे. हनी सिंगची ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एक सामान्य मुलगा ते एक लोकप्रिय रॅपर आणि त्यानंतर आलेलं आजारपण आणि मग केलेला जबरदस्त कमबॅक असा त्याचा संपुर्ण प्रवास डॉक्युमेंटरीमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यातून त्याचे अनेक सिक्रेट उलगडणार आहेत.
View this post on Instagram
ऑस्कर पुरस्कार विजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे ‘यो यो हनी सिंग : फेमस’ची निर्मिती करण्यात आली आहे. हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित ही डॉक्युमेंटरी येत्या 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
आजही हनी सिंगच्या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसते. आपल्या हटके स्टाइल आणि स्वॅगने त्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. आजवर हनी सिंगने अनेक हिट गाणी दिली आहेत. ‘लुंगी डान्स’, ‘आता माझी सटकली’ ही त्याची गाणी खूप लोकप्रिय झाली.
हेही वाचा:





