टीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रॅपर यो यो हनी सिंग करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

Yo Yo Honey Singh Now Dating Actress Heera Sohhal | पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग त्याच्या गाण्यांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो. आता रॅपर यो यो हनी पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. हनी सिंग याआधी अभिनेत्री मॉडेल टीना थडानीला डेट करत होता. पण काही महिने डेट केल्यानंतर 2023 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर त्याचे आणखी एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले जात आहे.
हनी सिंग अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत आहे. दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. मुंबईत होळीच्या वेळी हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्येही दोघांना एकत्र पाहण्यात आल्याचेही म्हंटले जात आहे. Yo Yo Honey Singh |
View this post on Instagram
दरम्यान, पंजाबी अभिनेत्री हीरा ‘थँक गॉड’मध्ये दिसली आहे. अनेक चित्रांमध्ये लोकांनी तिला मलायकाची कॉपी म्हटले आहे. गेल्या महिन्यात हनी सिंग आणि हीरा एकत्र रोमँटिक ट्रिपला गेले होते. मात्र अद्याप दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जेव्हा हनी सिंग आणि टीना थडानी वेगळे झाले तेव्हा दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. यासोबतच एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट केले. टीनाला डेट करण्यापूर्वी हनी सिंगने शालिनी तलवारसोबत लग्न केले होते. 2011 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र घटस्फोटानंतर हनी सिंग टीनाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या. मात्र टीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता त्याचे नाव हीरा सोहलसोबत जोडले जात आहे. Yo Yo Honey Singh |
हेही वाचा:
विधान परिषदेत कोणत्या उमेदवाराची विकेट पडणार? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितले





