Indian Railway Rules : रेल्वेनं प्रवास करताना अचानक मृत्यू झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का?

भारतामध्ये ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. रेल्वेमुळे लोकांचा बराचसा वेळ वाचतो. रेल्वेला लाईफलाईन म्हंटले जाते. कारण ट्रेननं प्रवास करणं हे खूप सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायक वाटतं. त्यामुळे अनेक लोक देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वेची निवड करतात. मात्र भारतीय रेल्वेनं ट्रेननं प्रवास करणाऱ्यांच्यासाठी काही नियम तयार केले आहेत.मात्र यातील काही नियमांबद्दल आपल्याला माहितदेखील नसते.
रेल्वेचा अपघात झाला आणि त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली जाते. हा नियम सगळ्यांना माहित आहे. पण रेल्वेने प्रवास करताना अचानक कोणाचे निधन झाले तर काय? रेल्वेकडून भरपाई दिली जाते का? दिली तर किती भरपाई दिली जाते? याबाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया..
भारतीय रेल्वे वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, जर ट्रेनमध्ये कोणत्या व्यक्तीच्या निधनाचं कारण जर रेल्वे असेल तर त्याला भरपाई दिली जाते. पण जर कोणत्या आजारामुळे किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे त्यांचं निधन झालं तर भारतीय रेल्वेकडून त्याला कोणतीही भरपाई दिली जात नाही.
अनेकवेळा प्रवाशांचा अपघात रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरताना होतो. अनेकांचं निधन हे ट्रेनच्या खाली चिरडल्यानं होतं. तर अनेकांना गंभीर दुखापत होते. अशा परिस्थितीत जर चूक ही प्रवाशाची असेल तर त्यांना भरपाई मिळत नाही. पण जर ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना कोणत्या प्रवाशाच्या निधनाचं कारण रेल्वे असली तर त्यांना भरपाई मिळते.
तसेच अनेक लोक हे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून अनेक लोकांचं निधन होतं आणि अनेक लोकांना गंभीर दुखापत देखील होते. आत्महत्या करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि त्यांना किती भरपाई मिळते? त्याबद्दल जाणून घेऊयात..
किती भरपाई मिळते?
IRCTC रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां 35 पैशांसाठी जवळपास शून्य प्रीमियमवर 10 लाख रुपयांचा वीमा मिळतो. हा वीमा प्रवाशांसाठी सगळ्यात स्वस्त असतो. IRCTC या अॅप किंवा वेबसाइटच्या मदतीनं तिकीट बूक केलं तर पेमेंट प्रोसेस दरम्यान, इंशॉरन्सचा पर्याय देण्यात येतो. त्या पर्यायाला सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 35 पैशांमध्ये वीमा कव्हर करून मिळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की PNR नं जितक्या लोकांचं तिकिट बूक होतं त्या सगळ्यांना हा इंशोरन्स लागू होतो.





