Ritu Tawde : मुंंबईच्या महापौरांचं मनगटावरील घड्याळ १ कोटींचं? रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, फोटो शेअर करत म्हणाल्या…
Ritu Tawde : मनगटावरील घड्याळाची किंमत एक कोटी असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण देत दावा करणाऱ्याला खडेबोल सुनावले आहेत.

Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे चागंल्याच चर्चेत आल्या आहेत. यासंबंधी सोशल मीडियावरून एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असून या पोस्टमध्ये रितू तावडे यांच्या मनगटावरील घड्याळ तब्बत एक कोटी रुपयांचे असल्याचा मोठा दावा केला जात आहे.
यामुळे रितू तावडे यांना यावरून सोशल मीडियावरून ट्रोल देखील करण्यात येत आहेत. अशातच रितू तावडे यांनी स्वतः या घड्याळाला घेऊन करण्यात आलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
रितू तावडे यांनी एक्सवरून पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.” असे सांगितले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, “अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही,” असे स्पष्टीकरण देत ज्यांनी घड्याळ एक कोटी रुपयांचे असल्याचा दावा केला होता त्यांना खडसावले आहे.
ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.
माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.
अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.
अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही. https://t.co/QqeuQWze27 pic.twitter.com/JQJlTQCbff
— Ritu Tawde (@TawdeRitu) February 26, 2026
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता. या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख रुपये असून, भारतातील बाजारमूल्य एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच महापौर रितू तावडे यांनी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
घड्याळाची आवड असल्यामुळे महापौरच्या हाताकडे लक्ष गेले
एकदम महागडे
Yellow gold Rolex Daytona light dial
माझ्याकडून रिस्पेक्ट … रिटेल किंमत 60-70 लाख … भारतातली मार्केट किंमत १ करोड पेक्षा जास्त pic.twitter.com/cGvivU9Ofn
— गजाभाऊ (@gajabhauX) February 26, 2026





