Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या; 10 वर्षापूर्वीच्या प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
Ritu Tawde: दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Ritu Tawde : रितू तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेचा पदभार स्विकारल्यापासून त्या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मनगटावरील घड्याळ कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत तसे काही नसल्याचे सांगितले. यानंतर महापौरांच्या वाहनावर लाल दिवा लावल्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
अशातच 10 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात रितू तावडे यांनी सत्र न्यायालयाकडे दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे रितू तावडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
२०१६ मध्ये दोन शिक्षकांना मारहाण प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना दोषमुक्त करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. मानथकर यांनी रितू तावडे यांचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणावर न्यायालयाने मारहाणीच्या आरोपावरून खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय? Ritu Tawde
29 जुलै 2016 रोजी वाकोला परिसरातील महापालिकेच्या एका उर्दू माध्यम शाळेतील शाळेतील एका महिला शिक्षिकेची बदली वांद्रे कुर्ला संकुल येथील दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. संबंधित शिक्षिका कर्करोगाने ग्रस्त असल्याने तिच्या बदलीला विरोध करण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते. तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी तावडे यांनी दोन शिक्षकांना कानखाली मारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Ritu Tawde
तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी तावडे यांच्यावर भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३३२ (दुखापत करणे) आणि ५०४ (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रितू तावडे यांचा दावा Ritu Tawde
या प्रकरणी रितू तावडे यांनी राजकीय सूडबुद्धीतून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे महापौर तावडे यांच्याविरुद्ध मारहाण खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
हेही वाचा : Tan Removal Face Mask: उन्हामुळे काळवंडलेली त्वचा? घरच्या घरी तयार करा ५ फेस मास्क, काही दिवसांत दिसेल फरक





