Narhari Zirwal : मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या कार्यालयातच लाचखोरीचा प्रकार घडल्याने या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ ( Narhari Zirwal ) यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता या लाचखोरी प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात ज्या लिपिकाने लाच स्विकारल्याचे आढळून आहे, त्याची चौकशी केली जात आहे. मंत्रालयात लाचखोरीचा जो प्रकार घडला तो अतिशय कलंक लावणारा आहे. या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे. तसंच विभागामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू केली असून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. मंत्रालयात अर्धवट प्रक्रिया केलेल्या फाइल्स आणून बळजबरीने सह्या घेतल्या जातात का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत नरहरी झिरवाळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, फाइल बळजबरीने समोर आणून सह्या केल्याचं घडलं नाहीय. स्टे देणं, निलंबन करणं, शहानिशा करून दिलासा देण्याची प्रक्रिया होती. सह्या करून द्या, प्रक्रिया नंतर करू असं कधीच नाही झालंय. जाब जबाब करूनच कार्यवाही केली जाते. या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांना अडकवण्याचा प्रयत्न कुणी करतयं अशी एक शंका सातत्याने उपस्थित केली जात आहे. यावर देखील झिरवळ यांनी भाष्य करत मला तसं आजिबात वाटत नाही. माझा कोणावरही असा संशय नाहीय. माझ्याबाबत कुणी मुद्दाम केलंय असंही नाही. माझं कुणाशीही वैमनस्य नसल्यानं असा प्रकार कुणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. Narhari Zirwal सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आणखी एक बैठक झाली. याच बैठकीत सुनेत्रा पवारांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगितले जात होते. यावर झिरवळ म्हणाले, सुनेत्राताई पवार यांनी नाराजी व्यक्त केली असं काही नाही. त्यांनी सूचना केल्या असं म्हणता येईल. जर मंत्रालयात असा प्रकार घडला असेल तर सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची भूमिका असल्याचे झिरवळांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी बोलणार मंत्रालयात लाचखोरी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट बोलणं झालेलं नाही. मात्र त्यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा : Pineapple: चवीला गोड आणि आरोग्यासाठी गुणकारी ‘सुपरफ्रूट’