‘बिग बॉस मराठी सिझन 6’मध्ये श्रेयस तळपदेची एन्ट्री? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

Shreyas Talpade | मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील सीझनप्रमाणे यंदाही अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार आहे. मात्र यंदाच्या शोमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. यातच आता मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा डंका गाजवणारा अभिनेता बिग बॉस मराठी सिझन 6मध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पिंकव्हिलाने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर, श्रेयस तळपदे लवकरच बिग बॉस सिझन 6मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. पिंकव्हिलाची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. यामुळे चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या चर्चांवर श्रेयसने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. Shreyas Talpade |
View this post on Instagram
श्रेयसने सांगितले की, “आजकाल अशा गोष्टी घडणं सामान्य झालं आहे. या निव्वळ अफवा आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करा. दुर्दैवाने, कलाकारांना खूप सहज टार्गेट केलं जातं आणि काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.” श्रेयसच्या या स्पष्टीकरणामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
दरम्यान, श्रेयस नवीन वर्षात आझाद भारत, द गेम ऑफ गिरगिट, वेलकम टू द जंगल या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाला दिलेल्या आवाजाने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्या या कामगिरीचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. Shreyas Talpade |
हेही वाचा:
विरोधक समोरासमोर येताचं काय घडलं? संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण





