विरोधक समोरासमोर येताचं काय घडलं? संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण

Sanjay Raut and Eknath Shinde | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. दोघेही गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन एकनाथ शिंदे देखील येत होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.
हे दोन्ही नेते एकमेकांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केले. आज या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजुला सारुन या दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने निघून गेले. मात्र, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तब्येतीची विचारपूस
दरम्यान, संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारपणातून बाहेर आले आहेत. ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करुन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्यासमोरच आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. Sanjay Raut and Eknath Shinde |
महापालिका निवडणूकांपूर्वी दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर टीका सुरू असताना या भेटीने महाराष्ट्रातील राजकारणाचे आशादायी चित्र समोर आले आहे. Sanjay Raut and Eknath Shinde |
हेही वाचा:
अजित पवार VS भाजप, संघर्षाचं कारण काय? जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित म्हणाले “दोन मोठे पक्ष आणि..”





