लग्न करणं गरजेच आहे का ? अभिनेत्री प्राजक्ता माळीने विचारलेल्या प्रश्नावर श्री श्री रवीशंकर म्हणतात…

मुंबई – नुकतीच मराठमोळी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात हजेरी लावली. यावेळी प्राजक्ताने रवी शंकर यांना लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. श्री श्री रविशंकर यांच्या बंगळूरमधील आश्रमात हा किस्सा घडला.
प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाऊन जपही केला. यावेळेसचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील प्राजक्ताने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बंगळूर येथील आश्रमात प्राजक्ताला थेट श्री श्री रविशंकर यांचंही संवाद साधण्याची संधी मिळाली.
“जीवनामध्ये विवाह करण्याची गरज आहे ?” असा थेट सवाल प्राजक्ता माळीने यावेळी श्री श्री रविशंकर यांना विचारला. यावर रविशंकर म्हणाले,”तू मला विचारत आहेत, असं असत तर कधीच माझ्याबाजूला अजून एक खुर्ची लागली असती” असं मिश्किल भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
तुम्ही खुश राहणं गरजेचं आहे. तुम्ही लग्न करून खुश रहा किंवा न करता खुश रहा .. परंतु आंनदी राहणं गरजेचं आहे. असं स्पष्ट मत यावेळी श्री श्री रवीशंकर यांनी व्यक्त केलं. काही लोक मात्र एकटे राहिले तरी दुःखी असतात आणि लग्न करूनही दुःखी राहतात. तुम्ही ठरवा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्वाचं असल्याचे यावेळी श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केले.





