जॅकलीन फर्नांडिस पोहचली श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात; शेअर केले खास फोटो

Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या जॅकलिन बंगळुरुमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पोहचली आहे. येथील काही सुंदर क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, “माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आले आहे. मला मार्ग दाखवण्यासाठी गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे मनापासून धन्यवाद. मी तुमची ऋणी आहे”, असं तिने लिहिलंय. या फोटोंमध्ये जॅकलिन घोडेस्वारी करताना, गायीला प्रेमाने थोपटताना दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात दाखल झाल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच अध्यात्मिक झलक पाहायला मिळाली आहे. जॅकलिनच्या आधी विक्रांत आणि हिना खान यांनीही श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली आहे. Jacqueline Fernandez |
जॅकलिन सध्या तिच्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यानंतर लवकरच ती ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात लारा दत्ता, दिशा पटानी, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी सारखे स्टार दिसणार आहेत. Jacqueline Fernandez |
हेही वाचा:





