अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अंबानी कुटुंबासोबत आहे खास कनेक्शन

Ananya Panday | बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनन्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता आदित्य राय कपूरला डेट करत होती, पण अचानक त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले. त्यानंतर ती क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. पण आता अनन्या सध्या दुसऱ्याचं व्यक्तीच्या प्रेमात आहे. अलीकडेच तिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली आणि इथेच तिच्या नव्या नात्याची चर्चा सुरू झाली.
अनन्या माजी मॉडेल वॉकर ब्लँकोला डेट करत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान क्रूझ पार्टीमध्ये अनन्या वॉकरला भेटली. दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग निर्माण झाले आहे. दोघांचे लग्नात डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. अनन्या पांडे चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर ती चर्चेत असते. Ananya Panday |
View this post on Instagram
याआधी अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिने AW नावाचा पेंडेंट घातले होते. यानंतर A म्हणजे अनन्या पण W म्हणजे वॉकर ब्लँकोला असा अंदाज काहीजण लावत आहेत. दरम्यान, वॉकर ब्लँको हा अमेरिकेचा रहिवासी आहे. तो एक माजी मॉडेल आहे. तसेच वॉकर हा जामनगरमध्ये राहतो आणि अंबानींसाठी वांतारा ॲनिमल पार्कमध्ये काम करत असल्याचेही म्हंटले जाते.Ananya Panday |
दरम्यान, अनन्या पांडे शेवटची नेटफ्लिक्सवरील ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ‘कॉल मी बे’ सीरिजमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; संजय राऊतांवरील ‘ते’ विधान भोवणार





