अभिनेत्री अवनीत कौरने गुपचुप उरकला साखरपुडा? ‘त्या’ फोटोंमुळे रंगली चर्चा

Actor Avneet Kaur | अभिनेत्री अवनीत कौरने वयाच्या 9 व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मालिकांसह तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 2012 रोजी प्रसारित झालेल्या ‘मेरी मॉं’ या मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय ती एक डान्सर देखील आहे. ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’च्या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
नुकतेच अवनीत कौरने कान्स फिल्म फेस्टिवललादेखील हजेरी लावली होती. येथील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या लुकला चाहत्यांची देखील पसंती मिळाली होती. यानंतर आता अवनीत कौरने वयाच्या 22 वर्षी साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे.
अवनीतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. “चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. मी या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा करू शकत नाही” असं कॅप्शन अवनीतने या फोटोला दिले आहे. Actor Avneet Kaur |
View this post on Instagram
या फाटोमध्ये अवनीतने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला. पण अवनीतच्या अंगठीने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलंय. अभिनेत्रीने शेअर केलेल्या दोन्ही फोटोत अवनीत तिची अंगठी दाखवतेय यामुळेच अवनीतचा साखरपुडा झालाय की काय या चर्चांना उधाण आले आहे.
अवनीतचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर “तिने साखरपुडा केलाय का?”, “मला वाटते की तिने साखरपुडा केला असावा,” अशा कमेंट तिच्या फोटोवर केल्या आहेत. अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. Actor Avneet Kaur |
हेही वाचा:





