खान कुटुंबात लवकरच होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री?

अभिनेता अरबाज खान आणि शूरा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडते जोडपे आहे. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यांचे लग्न झाले. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
या व्हिडिओमध्ये अरबाज आणि शूरा हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी बाहेर आधीच उपस्थित असलेल्या पापाराझींनी दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. बाहेर येताना पापाराझींनीही त्याला गुड न्युज आहे का असे विचारले. व्हिडिओमध्ये, अरबाज खान कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत होता, तर शूरा खानने क्रॉप-टॉप आणि डेनिम शॉर्ट्ससह उघडा शर्ट घातला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पापाराझी जोडप्याला विचारतात, ‘काय गुड न्यूज आहे का?’ तर अरबाज आणि शुरा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते त्यांच्या कारमध्ये बसले आणि काहीही न बोलता निघून गेले. अरबाज आणि शुराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनीही एक वर्षाहून अधिक काळ डेट केल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केले.
दोघांचे लग्न अनेकांसाठी सरप्राईज होते, कारण हे जोडपे कधीच एकत्र दिसले नव्हते. नंतर अरबाजने खुलासा केला की ते सुमारे एक वर्ष डेट करत होते आणि ते नियमितपणे रेस्टॉरंटमध्ये जात होते.
अलीकडेच शुराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती अरबाजला भेटण्यासाठी विमानतळाबाहेर धावली होती. या व्हिडिओमध्ये ती तिथून अभिनेत्याचा हात धरून परत जातानाही दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.





