“खामेनींवर हल्ला झाला तर युद्ध होणारच..,” ; इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला दिला थेट इशारा

Iran on Donald Trump। इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावरील कोणताही हल्ला हा संपूर्ण इराणविरुद्ध उघड युद्ध मानला जाईल, असे म्हणत अमेरिकेला कडक इशारा दिला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
पेझेश्कियान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये,”आमच्या महान नेत्यावर हल्ला हा इराणविरुद्ध पूर्ण-प्रमाणात युद्धासारखा असेल ” असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी दिलेल्या एक मुलाखतीत इराणला नवीन नेतृत्वाची आवश्यकता आहे. असे म्हटले. त्यानंतर पेझेश्कियान यांनी हा इशारा दिला आहे.
इराणी अध्यक्षांनी लिहिले आहे की, “आमच्या महान नेत्यावर कोणताही हल्ला हा इराणी राष्ट्राविरुद्ध पूर्ण-प्रमाणात युद्धासारखा असेल.” त्यांनी देशाच्या आर्थिक समस्यांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले. ते म्हणाले की, “अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी लादलेल्या दीर्घकालीन शत्रुत्व आणि अमानवीय निर्बंधांमुळे इराणी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.” यापूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना गुन्हेगार म्हटले होते. तसेच इराणमध्ये अलिकडच्या अशांत काळात झालेल्या मृत्यू आणि नुकसानीसाठी ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांचा तीव्र हल्ला Iran on Donald Trump।
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावरही तीव्र हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, इराणमधील दशकांपासून चालत आलेली राजवट संपली पाहिजे आणि देशाला नवीन नेतृत्व दिले पाहिजे. ट्रम्प यांच्या मते, अलिकडच्या आठवड्यात इराणमध्ये झालेले निदर्शने राजकीय दबाव, आर्थिक संकट आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यांच्याशी संबंधित जनतेच्या संतापाचे परिणाम आहेत.
ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांवर आरोप केले Iran on Donald Trump।
ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांवर भीती आणि हिंसाचाराच्या माध्यमातून राज्य करण्याचा आरोप केला. त्यांनी असेही म्हटले की सध्याचे नेतृत्व सत्तेत राहण्यासाठी दडपशाहीचा अवलंब करते आणि देशाला उद्ध्वस्त करते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळापासून तेहरान आणि वॉशिंग्टनमधील संबंध अधिकाधिक तणावपूर्ण राहिले आहेत. या काळात, अमेरिकेने कठोर दबाव आणण्याचे धोरण सुरू ठेवले आहे आणि दोन्ही देशांच्या नेत्यांनी वारंवार शब्दांची देवाणघेवाण केली आहे.





