बेंजामिन नेतान्याहूने मानले आभार
\nदरम्यान, इराणच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. दरम्यान, इराणने क्षेपणास्रे डागल्याने इस्रायलने संभाव्य परिस्थितीसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. तसंच कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर राष्ट्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक
\nइराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रविवारी तातडीची बैठक होणार आहे. तसंच, इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने दूर राहावं, असा इशाराही इराणने अमेरिकेला दिला आहे.