Iran Nuclear : ‘असुरक्षित अणू ऊर्जेच्या ठिकाणांची देखरेख अशक्य’; संयुक्त राष्ट्राच्या अणू ऊर्जा संस्थेला इराणची माहिती
विशेषतः इराणच्या अणू ऊर्जेशी संबंधित ठिकाणांवर सातत्याने हल्ल्यांचा धोका असल्यामुळे या ठिकाणांची पहाणी करण्याबाबतच्या वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या जाऊ शकणार नाहीत.

Iran Nuclear – इराणमधील अणू ऊर्जेशी संबंधित ठिकाणांना लष्करी हल्ल्यांचा धोका असल्यामुळे या ठिकाणांची दखरेख केली जाऊ शकणार नाही, असे इराणने संयुक्त राष्ट्राच्या अणू ऊर्जा संस्थेला सांगितले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षांकडून इराणवर , विशेषतः इराणच्या अणू ऊर्जेशी संबंधित ठिकाणांवर सातत्याने हल्ल्यांचा धोका असल्यामुळे या ठिकाणांची पहाणी करण्याबाबतच्या वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या जाऊ शकणार नाहीत.
जोपर्यंत सद्यस्थितीचे मूळ कारण दूर केले जात नाही आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि फेरउभारणी होत नाही, तोपर्यंत सध्याच्या समस्येवकर तोडगा काढला जाऊ शकणार नाही, असे इराणने म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने गेल्या वर्षी १२ दिवसांच्या युद्धादरम्यान इराणच्या अणू प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांपासून इराणने आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेला या ठिकाणांची पहाणी करू दिलेले नाही. मात्र या ठिकाणांची पहाणी करता न येणे हे अणूऊर्जेच्या धोक्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असे आयएइएने म्हटले आहे.
२० दशलक्ष डॉलरच्या बक्षिसाबाबत चिंता
इराणच्या अणू प्रकल्पांबाबत माहिती देणाऱ्याला अमेरिकेने २० लाख डॉलरचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल इराणने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जेच्या उपक्रमांबाबत गोपनीयता बाळगण्याची गरजही इराणने अधोरेखित केली आहे.
तसेच इराणच्या अण्विक कार्यक्रमांबाबतची माहिती उघड करण्यात येऊ नये. या माहितीचा गैरवापर करण्यात येऊ नये आणि या माहितीच्या आधारे इराणचे शोषण केले जाऊ नये, अशी अपेक्षाही इराणने व्यक्त केली आहे.
अणू प्रकल्पांच्या पहाणीसाठी निरीक्षकांना परत येण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी तांत्रिक आणि टप्प्याटप्प्याने उपाययोजनांचा विचार करण्याचे आवाहन आयएईएने इराणला केले आहे.






